ठाणेभिवंडी लोकसभा मतदार संघाचा झपाट्याने विकास करण्यासाठी निलेश सांबरे यांना विजयी करण्याचे...

भिवंडी लोकसभा मतदार संघाचा झपाट्याने विकास करण्यासाठी निलेश सांबरे यांना विजयी करण्याचे आवाहन

spot_img

भिवंडी : भिवंडी लोकसभा मतदार संघाचा झपाट्याने विकास करण्यासाठी तसेच केंद्र व राज्यसरकारच्या सर्व योजना महिला, युवक व शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी भिवंडी लोकसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांना शिलाई मशीन या चिन्हाच्या समोरील बटन दाबून विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

      जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष नीलेश सांबरे यांनी संपूर्ण मतदार संघात विजय निर्धार यात्रेच्या माध्यमातून खेडेगावात जाऊन लोकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत.  त्यांच्या या यात्रेत सर्वसामान्य नागरिकांची झुंबड उडत आहे.

      नीलेश सांबरे हे गेल्या 2 दशकापासून भिवंडीसह ठाणे, पालघर जिल्ह्यात सामाजिक व शैक्षणिक कार्यात स्वखर्चाने पूर्ण वेळ काम करत आहेत. सर्वसामान्यांना अन्न, धान्य, वस्त्र, निवारा, आरोग्य व शिक्षणासाठी करोडो रूपयांचा निधि स्वखर्चातून खर्च केला आहे. त्यामुळे हे सर्वसामान्यांना आपल्या हक्काचा माणूस म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.  

निलेश सांबरे यांचा जाहीरनामा

१) मतदार संघामध्ये 25 CBSE शाळा सुरु करणार व त्यात मुलींसाठी 5  विशेष शाळा सुरू करणार

2) जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून भिवंडी लोकसभा क्षेत्रातील युवकांना स्पर्धा परीक्षा गट “क” आणि ड चे प्रशिक्षण देऊन दरवषी किमान 15000 तरुणांना रोजगार देण्यासाठी 100% प्रयत्न करण्यात येईल

3) मतदार संघामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत, वॉर्डमध्ये  E लायब्ररी निर्माण करणार.

4) प्रतिवर्थी । लाख महिलांना केंद्र सरकार व राज्यसरकारच्या योजनांनुसार प्रतिक्षण देऊन स्वयंरोजगार निर्माण करणार

5) कसारा आणि कर्जत दोन्हीकडच्या लोकल वाढवण्यात येतील व त्यामध्ये महिलांसाठी विशेष लोकलची  व्यवस्था करण्यात येईल.

6) 15 नवीन रुग्णवाहिका मतदार संघामध्ये देणार

7) 96 नवीन आरोग्य क्लिनिक सुरु करणार

8) 300 खाटांचे अद्यावत रुग्णालय उभारणार

9) 100 हुन अधिक मोफत कोचिंग क्लासेस सुरु करणार रेल्वे स्टेशन प्ॉरफॉर्म वाढविण्यात येतील, तसेच सर्व रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण करण्यातयेईल,

10) प्रत्येक रेल्वे स्टेशनला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहेल महिलांसाठी व पुरुषासाठी सुलभ शौचालयाची व्यवस्था असेल, अगदी लहान मुलांना स्तनपान करण्यासाठी विशेष सुविधा असेल

11) शहर असो कि या ग्रामिण भाग, घरोघरी पिण्याचे पाणी मिळेल. त्याचप्रमाणे संपूर्ण लोकसभा क्षेत्रामध्ये पिण्याच्या पाण्याचा विषय हा गंभीरपणे हाताळण्यात येईल. आमच्या कुठल्याच माय माऊलीला पाणी टंचाईमुळे त्रास होणार नाही अशी व्यवस्था करण्यात येईल

12 ) बस डेपोची परिस्थिती बघितली तर भयानक आहे. सर्व बस डेपो व्यवस्थित व्यवस्थापन करून पिण्याच्या पाण्याची सुविधा, महिला कर्मचायांच्या व पुरुष कर्मचायांच्या राहण्याची व्यवस्था, प्रवास करणाच्या प्रवासांच्या व्यवस्थेत टॉयलेट, बाथरुम सर्वच्या सर्व सुशोभीकरण

करण्यात येईल.

13) बस स्टैंड, रेल्वे स्टेशन, कॉलेज परिसरामध्ये फ्री WIFI उपलब्ध करून देण्यात येईल.

14) सर्व बस थांबे नूतनीकरण करून मोफत पिण्याचे पाणी, मोफत WIFI व मोफत शौचालय बांधण्यात येतील,

15) दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, शेळीपालन व फूलशेतीच्या माध्यमातून शेतकयांना चांगले मार्केट उपलब्ध करून देण्यात येईल व शेतकऱ्यांच्या मालाला योग्य बाजारभाव मिळवून देण्यात येईल.

16) भिवंडी लोकसभा मतदार संघातील कुठल्याही विद्यार्थ्यांचं शिक्षण आर्थिक परिस्थितीमुळे थांबणार नाही व कुठलाही रुग्ण उपचाराविणा दगावला जाणार नाही याची काळजी मी घेईन

17) कामगारांना सर्व व्यवस्थेचा लाभ मिळवून देणार, त्यासाठी विशेष समिती स्थापन करणार भिवंडी लोकसभा क्षेत्रात टेक्सस्टाईल, आयटीपार्क, एज्यूकेशन हब, हेल्थ हब, एम्ससारखे मेडीकल कॉलेज व हॉस्पिटल उभारणार

18) बदलापूर, कल्याण आणि भिवंडी येथे आयटीपार्क सुरु करून तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणार

19) भिवंडीतील टोरंट पावरचा प्रश्न सोडवणार

20) शहापूर, वाडा व मुरबाड येथे मेट्रो आणणार

21) मुरबाड रेल्वेचा प्रश्न 100% मार्गी लावणार

22) भिवंडी मधील लुमचा असलेला मोठा प्रश्न मार्गी लावण्यात येईल.

23) केंद्र व राज्यसरकारच्या सर्व योजना महिला, युवक व शेतकऱ्यांना मिळवून देण्यात येतील.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्री. डी.सी. डुकरे सर यांना २०२४ चा राज्यस्तरीय लोकराजा शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

परभणी : मागील तीस वर्षांपासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे अभ्यासू अध्यापक तथा राष्ट्रमाता इंदिरा...

धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे देण्याची मागणी

नाशिक : धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी व विशेषतः धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे या...

मा. मंत्री आण्णासाहेब डांगे यांचे सुपुत्र सर्जेराव डांगे यांचे दुःखद निधन

इस्लामपूर : येथील सर्जेराव रामचंद्र डांगे (दादा) यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले...

महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा उत्साहात साजरा…

पुणे: महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा वाफगाव या त्यांच्या जन्मगावी अहिल्यारत्न...