महाराष्ट्रधनगर समाजामध्ये सरकारविषयी तीव्र असंतोष,  म्हसवडचे आमरण उपोषण ११ व्या दिवशीही सरकारकडून...

धनगर समाजामध्ये सरकारविषयी तीव्र असंतोष,  म्हसवडचे आमरण उपोषण ११ व्या दिवशीही सरकारकडून बेदखल

spot_img

म्हसवड : धनगर समाजाच्या हक्काच्या अनुसूचीत जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करावी. यासाठी राज्यात सातत्याने आंदोलन होत आहेत. म्हसवड येथे गेल्या ११ दिवसापासून सुरू असलेले धनगर आरक्षणासाठीचे आमरण उपोषण ११ व्या दिवशीही सरकारकडून बेदखल करण्यात आले आहे. या आंदोलनातील उपोषनकर्त्यांना सरकारच्या वतीने तहसिलदार यांच्या शिवाय कोणीही भेटले नसल्याने धनगर समाजामध्ये सरकारविषयी तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

      सातारा जिल्ह्यातील म्हसवड पालिका कार्यालयसमोर दि. २६ जानेवारीपासून उत्तम वीरकर, जयप्रकाश हुलवाल व गणेश केसकर या तीन तरुणांनी धनगर आरक्षण अंमलबजवणी आमरण उपोषण सुरू केले आहे. यांना पाठिंबा देण्यासाठी दि ५ फेब्रुवारी रोजी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  हजारोंच्या संख्येने समाजबांधव जमा झाला होता. यावेळी राज्यातील सर्व धनगर बांधवांनी एकत्रितपणे लढा उभारून रास्ता रोको करत मुंबईत आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार राज्यव्यापी धनगर समाजाच्या मेळाव्यात करण्यात आला. तसेच आगामी काळात सर्व आमदार, खासदारांनी लक्ष घालून धनगड या शब्दाऐवजी धनगर हा शब्द दुरुस्त करून एसटी प्रवर्गातून सवलत मिळावी, यासाठी केंद्र व राज्य सरकारने राष्ट्रपतींकडे दुरुस्तीसाठी शिफारस करावी. अन्यथा सरकारसोबत संघर्ष अटळ असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

      या मेळाव्याला माणचे आमदार जयकुमार गोरे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, राज्य मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य लक्ष्मण हाके, अॅड. सचिन जोरे, दादासाहेब हुलगे, डॉ. प्रमोद गावडे, बबनदादा वीरकर, दादासाहेव दोरगे, माजी नगराध्यक्ष भगतसिंह वीरकर, अप्पासाहेव पुकळे, मामुशेठ वीरकर, धीरज खटके, डॉ. वसंत मासाळ, बाबासाहेब माने, शरद गोरड, अॅड. नितीन कटरे, उषा कोडलकर, सविता घटुकडे, डॉ. आरती माने गावडे, आशाताई वीरकर, विलासीबाई वीरकर, सारिका धायगुडे, सुरेखा अर्जुन, शोभा पांडुले आदी महिला उपस्थित होत्या.

उपोषणकर्त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी. माण, खटाव, फलटण, खंडाळा, माळशिरस, सांगोला, औसा, लातूर, पंढरपूर, कवठेमहांकाळ, आटपाडी, जत, कोल्हापूर सह राज्यातून मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव भेट देत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्री. डी.सी. डुकरे सर यांना २०२४ चा राज्यस्तरीय लोकराजा शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

परभणी : मागील तीस वर्षांपासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे अभ्यासू अध्यापक तथा राष्ट्रमाता इंदिरा...

धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे देण्याची मागणी

नाशिक : धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी व विशेषतः धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे या...

मा. मंत्री आण्णासाहेब डांगे यांचे सुपुत्र सर्जेराव डांगे यांचे दुःखद निधन

इस्लामपूर : येथील सर्जेराव रामचंद्र डांगे (दादा) यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले...

महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा उत्साहात साजरा…

पुणे: महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा वाफगाव या त्यांच्या जन्मगावी अहिल्यारत्न...