महाराष्ट्र‘धनगर माझा’ ने  “राजा बनो अभियाना” ला हातभारच लावला : डॉ.यशपाल भिंगे

‘धनगर माझा’ ने  “राजा बनो अभियाना” ला हातभारच लावला : डॉ.यशपाल भिंगे

spot_img

      ‘धनगर माझा’ पोर्टलवरुन मराठवाड्यातील पहिले धनगर जमातीचे आमदार कै.यमाजीराव सातपुते यांच्याबद्दल माहिती मिळाली. असा महत्त्वपूर्ण राजकीय इतिहास जमातीला समजावा या उद्देशाने पोर्टलचे संचालक माझे सन्मित्र श्री. धनंजय तानले यांनी काम सुरु केले आहे, ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे. यासाठी मी श्री. तानले यांचे सर्व जमातीच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो.

      आपण धनगर जमातीचे लोक स्वतः ला राज्यातील दोन क्रमांकाची लोकसंख्या असलेली जमात मानतो.जर एक नंबरच्या समाजाने या राज्याला कायम मुख्यमंत्री पुरवले असतील तर आपण दोन नंबरच्या जमातीने उपमुख्यमंत्री पद पुरवण्याची जिम्मेदारी स्वीकारायला हवी; पण दुर्दैवाने तसे अजूनपर्यंत घडू शकलेले नाही. पहिल्या विधीमंडळात आपण अकरा आमदार पाठवले होते तर आज २०१९ च्या विधीमंडळात केवळ एक आमदार निवडून दिलेला आहे. आमच्या मराठवाड्यात तर मागील पस्तीस वर्षांत एकही आमदार निवडून गेलेला नाही. मराठवाड्यातून कै.यमाजी सातपुते हे पहिले आमदार १९६२ च्या विधीमंडळात निवडून गेले तर कॉ.विठ्ठलराव नाईक हे कळमनुरीतून निवडून गेलेले शेवटचे आमदार आहेत. त्यानंतर पस्तीस वर्षांची म्हणजे सात विधानसभा निवडणूकींची गॅप आहे. ही मराठवाड्यातील धनगर जमातीसाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. का म्हणून आमचा टक्का कमी झाला? याचे आत्मपरीक्षण करण्याची खरी गरज आहे.

कै.यमाजी सातपुते हे मुळातले कायद्याचे स्कॉलर होते. गंगापूर जि.छ.संभाजीनगर येथील ते एक अत्यंत नावाजलेले वकील होते. संपूर्ण मतदारसंघातील जनतेची ते मनापासून सेवा करीत होते. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन अडल्या नडल्या लोकांना मदत करीत होते. गरीब माणसाला मोफत सेवा पुरवित होते. यामुळे त्यांचा प्रचंड लौकिक वाढला. त्यावेळी गंगापूर विधानसभा ही कम्युनिस्ट पक्षाकडे होती. राज्याचे पहिले मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाणांना तिथे कॉग्रेसचा आमदार निवडून आणायचा होता .कै. सातपुतेंच्या आधी तेथे कॉग्रेसचा उमेदवार मराठा समाजाचा होता परंतु यश मिळत नव्हते.तेव्हा कै.यशवंतराव चव्हाणांनी संख्येने दोन नंबरवर असलेल्या धनगर जमातीतील कै.यमाजी सातपुते या हि-याचा शोध घेऊन त्यांना तिकीट दिले. पण १९५७ ला ते पराभूत झाले. परंतु त्यांनी घेतलेली मते मात्र लक्षणीय होते. दुस-यांदा ज्यावेळी त्यांना तिकीट दिले गेले त्यावेळी ते मोठ्या फरकाने विजयी झाले. आज आपल्यातील काही मंडळी कुठलाही अभ्यास न करता केवळ जातीय अभिनिवेशातून कै. यशवंतराव चव्हाण यांच्यावर टीका करतात. त्यांनीच जमातीचे फार नुकसान केल्याच्या बाता मारतात. कारण त्यांना इतिहासही माहित नसतो व कै. यशवंतरावांचे जीवनचरित्रही माहित नसते. केवळ द्वेष पसरवून टाळ्या घेण्यासाठी आपली मंडळी बोलत असतात.

लोकशाहीच्या प्रारंभाचा काळ हा मंतरलेला काळ होता. प्रचंड वैचारिक व उन्नत व्यावहारिक लोकांच्या राजकारणाचा तो काळ होता. पुणे जिल्ह्यातील एका भंगी समाजाच्या उमेदवाराला त्याकाळी कै. यशवंतरावांनी निवडून आणले होते. हे उदाहरणही खूप बोलके आहे. कै. यमाजीराव सातपुते साहेबांकडे आधी पात्रता होती. जनसंपर्क होता, म्हणून यशवंतरावांनी घरी जाऊन त्यांना विनवणी करुन उभे केले. राजकारण गरजेवर व बेरजेवर चालते, हे आपण लक्षात घेण्याची गरज आहे. कै. आमदार सातपुते साहेबांनी एक वेळ आमदारकी भूषवली व नंतर सन्यास घेतला. बदलत चाललेले वातावरण त्यांना मानवले नसावे.

आज तर त्याहीपेक्षा भयंकर स्थिती आहे. आणि धनगर जमातीची अवस्थाही भिषण आहे. अशावेळी मराठवाड्यातील धनगर आमदारांचे जीवनचरित्र समजून घेऊन, त्यांचे गुण आत्मसात करुन, त्यांच्या मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न करीत आपल्याला पुढे जावे लागेल. कै. सातपुते साहेब व शेवटचे आमदार कॉ. विठ्ठलराव नाईक या दोघांच्या राजकारणाची पद्धत, आपली गरज निर्माण करणारी शैली व अभ्यास आजच्या पिढीला कळावा यासाठी आम्ही मराठवाड्यातील दहा निवडक विधानसभा मतदारसंघातून ‘राजा बनो अभियान’ चालवत आहोत. पहिले पुष्प परळी येथे तर दुसरे पुष्प मुखेड येथे आयोजित केले. यानिमित्ताने प्रबोधन व्हावे, आपला राजकीय इतिहास समजावा व प्रेरणा घेऊन तरुणांनी तयारीनिशी आपापल्या मतदारसंघात कामाला लागावे या उद्देशाने आम्ही हे अभियान सुरू केलेले आहे. ‘धनगर माझा’ ने मराठवाड्यातील पहिले धनगरांचे आमदार कै. यमाजी सातपुते यांच्यावर प्रकाश टाकून आमच्या अभियानाला हातभारच लावलेला आहे, यासाठी मी श्री.धनंजय तानले यांचे आभार व्यक्त करतो.

डॉ. यशपाल भिंगे, नांदेड.

धनगर समाज चळवळीचे अभ्यासक

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्री. डी.सी. डुकरे सर यांना २०२४ चा राज्यस्तरीय लोकराजा शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

परभणी : मागील तीस वर्षांपासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे अभ्यासू अध्यापक तथा राष्ट्रमाता इंदिरा...

धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे देण्याची मागणी

नाशिक : धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी व विशेषतः धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे या...

मा. मंत्री आण्णासाहेब डांगे यांचे सुपुत्र सर्जेराव डांगे यांचे दुःखद निधन

इस्लामपूर : येथील सर्जेराव रामचंद्र डांगे (दादा) यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले...

महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा उत्साहात साजरा…

पुणे: महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा वाफगाव या त्यांच्या जन्मगावी अहिल्यारत्न...