महाराष्ट्रसमाजाच्या आग्रहाखातर पंढरपूरचे आमरण उपोषण स्थगित

समाजाच्या आग्रहाखातर पंढरपूरचे आमरण उपोषण स्थगित

spot_img

पंढरपूर :  गेल्या 16 दिवसापासून पंढरपूर येथे चालू असलेले धनगर समाज आरक्षण अंमलबजावणी उपोषण आज सोळाव्या दिवशी समाजाच्या आग्रहाखातर स्थगित करण्यात आले आहे.

पंढरपूर येथे उपोषणकर्त्यांना पाठबळ देण्यासाठी राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यातील सरकार तसेच विरोधी पक्ष या आंदोलनाला पाहिजे तेवढे गांभीर्याने घेत नसल्याने तसेच प्रत्येक उपोषणकर्त्याची तब्बेत खालवल्याचे दिसत असल्याने राज्यातील उपस्थित नागरिकांनी निषेध व्यक्त केला. धनगर आरक्षण अंमलबजवणीचा जीआर काढण्यासाठी सरकारने दिलेली मुदत संपली तरीपण ठोस पावले न उचलल्याने उपोषण कर्त्यांनी घरी न जाता सरकारच्या विरोधात समाजासाठी रस्त्यावरची लढाई लढायचा निर्णय घेतला. तसेच निवडणुकीमध्ये धनगर समाजाच्या व्यक्तीसाठी सर्वांनी काम करायचं असा निश्चय करण्यात आला.

इथे उपाशी तपाशी मरण्यापेक्षा खाऊनपिऊन समाजासाठी लढून मरु असा विचार समाजापुढे ठेवून पुढील दिशा लवकरच ठरवणार असल्याचे उपोषण कर्त्यांनी संगितले.

तत्पूर्वी राज्यातून आलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी व उपोषणकर्ते माऊली हरणावळ, दीपक बोराडे विजय तमनर, गणेश केसकर, योगेश धरम, यशवंत गायके यांच्याशी संवाद साधत भावना व्यक्त केल्या. उपोषणकर्त्यांच्या वतीने दीपक बोराडे यांनी सर्वांचे आभार मानत, दिलगिरी व्यक्त करत उपोषण स्थगित केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्री. डी.सी. डुकरे सर यांना २०२४ चा राज्यस्तरीय लोकराजा शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

परभणी : मागील तीस वर्षांपासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे अभ्यासू अध्यापक तथा राष्ट्रमाता इंदिरा...

धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे देण्याची मागणी

नाशिक : धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी व विशेषतः धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे या...

मा. मंत्री आण्णासाहेब डांगे यांचे सुपुत्र सर्जेराव डांगे यांचे दुःखद निधन

इस्लामपूर : येथील सर्जेराव रामचंद्र डांगे (दादा) यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले...

महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा उत्साहात साजरा…

पुणे: महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा वाफगाव या त्यांच्या जन्मगावी अहिल्यारत्न...