पुणेकिल्ले वाफगाव : महाराजा यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात साजरा

किल्ले वाफगाव : महाराजा यशवंतराव होळकर यांचा राज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात साजरा

spot_img

पुणे (धनगर माझा)  : पुण्यापासून जवळच असलेल्या किल्ले वाफगाव येथे चक्रवर्ती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर (प्रथम) यांचा राज्याभिषेक दिन व गड संवर्धन भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन ‘होळकर राजपरिवारा’ तर्फे करण्यात आले होते.

सदर कार्यक्रम व भूमीपूजनासाठी केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले, भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनीलजी देवधर, खा. अमोल कोल्हे, खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील, माजी मंत्री आमदार प्रकाश आवाडे, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, मा. खा. विकास महात्मे, मा. आ. पोपटराव गावडे, मा. आ. प्रकाश शेंडगे, मा. आ. रामराव वडकुते, बाळासाहेब दोलताडे, नवनाथ पडळकर, सुरेश कांबळे, घनशाम हाके, अर्जुन सलगर, शशिकांत तरंगे, गोविंद देवकाते यांच्यासह लष्कराचे काही अधिकारीसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यानिमित्ताने महाराजा यशवंतराव होळकर(प्रथम) यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत गजी नृत्य, मर्दानी खेळ, ढोल वादन सह भंडार्याच्या उधळणीने मोठ्याप्रमाणात करण्यात आली. या कार्यक्रमासाठी यशवंतराव महाराजांवर व होळकर घराण्यावर प्रेम करणारे समाज बांधव व भगिनी, अनेक ऐतिहासिक घराण्यांचे वंशज, सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्यरत मान्यवर, प्रशासकीय अधिकारी, अठरा पगड जातीतील विविध संघटना, इतिहास प्रेमी मोठ्या संख्येने राज्य व देशभरातून उपस्थित होते.

राजराजेश्वर चक्रवर्ती सम्राट महाराजा यशवंतराव होळकर यांचे भारतीय इतिहासातील योगदान अद्वितीय आहे. जगभरात अजिंक्यक मानल्या जाणाऱ्या इंग्रजांचा त्यांनी अनेक वेळा पराभव केला. भारतीय स्वातंत्र्य लढ्याची बीजं लढवय्या मनात पेरली.  राजस्थान, माळवा, पंजाब, दिल्ली इतक्या भल्या मोठ्या प्रदेशात महाराजांनी इंग्रजांविरुद्ध युद्धे लढली. भारतमातेच्या रक्षणासाठी आपसातील मतभेद विसरुन देशभरातील सर्व राजा महाराजांना एकत्र येण्याचे आवाहन केले. इंग्रज यशवंतराव महाराजांना भारताचा नेपोलिअन म्हणत. महाराजांशी बिनशर्त संधी करण्याची इंग्रजांची मानसिकता होती. मात्र महाराजा यशवंतराव होळकर यांना  स्वतंत्र हिंदुस्थान हवा होता. हा इतिहास तरुणांना प्रेरणादायी आहे.

या  देशभक्त राजाचे जन्मस्थान असलेला वाफगावचा भुईकोट किल्ला सुभेदार मल्हारराव होळकर यांनी बांधून घेतला होता. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या वास्तव्याने ही वास्तु पावन झाली आहे. अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार वाफगावचा किल्ला आज 250 वर्षां नंतर संवर्धित होत आहे हा आपल्या सर्वांसाठी एक ऐतिहासिक दिवस आहे.  या साठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे त्यामुळे परिसराचा विकास होईल, ग्रामस्थांना रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, पर्यटन वाढेल.. अशी भावना होळकर राजघराण्याचे वंशज भूषणसिंहराजे होळकर यांनी व्यक्त केली.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्री. डी.सी. डुकरे सर यांना २०२४ चा राज्यस्तरीय लोकराजा शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

परभणी : मागील तीस वर्षांपासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे अभ्यासू अध्यापक तथा राष्ट्रमाता इंदिरा...

धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे देण्याची मागणी

नाशिक : धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी व विशेषतः धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे या...

मा. मंत्री आण्णासाहेब डांगे यांचे सुपुत्र सर्जेराव डांगे यांचे दुःखद निधन

इस्लामपूर : येथील सर्जेराव रामचंद्र डांगे (दादा) यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले...

महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा उत्साहात साजरा…

पुणे: महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा वाफगाव या त्यांच्या जन्मगावी अहिल्यारत्न...