प्रेरणादायी प्रवासअभियंता दिन विशेष : जिथे कधी कधी पुरुष अधिकारी सुद्धा काम करण्यासाठी...

अभियंता दिन विशेष : जिथे कधी कधी पुरुष अधिकारी सुद्धा काम करण्यासाठी धजत नाहीत….

spot_img

            सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील तिलारी गावाजवळ तिलारी हा मोठा प्रकल्प बांधलेला आहे. तिलारी हा प्रकल्प नयनरम्य निसर्ग, घनदाट अरण्य तसेच ४००० ते ४५०० मिलिमीटर पाऊस अशा ठिकाणी बांधलेला आहे. अशा प्रकल्पावरती जिथे पुरुष अधिकारी सुद्धा काम करण्यासाठी धजत नाहीत अशा ठिकाणी माझी नियुक्ती २०१५ साली जलसंपदा विभागाने केली. मी दुष्काळ असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील जिथे मॅक्झिमम ५०० मिलिमीटर पाऊस असतो व तिलारी जिथे ४००० ते ४५०० मिलिमीटर पाऊस असतो असा दुष्काळ ते अतिवृष्टी असलेल्या प्रवास माझा सुरू झाला. माझी नियुक्ती तिल्लारी विभागांतर्गत तिल्लारी उपविभाग क्र. २, कोणाळकट्टा या उपविभागात २०१५ साली झालेली होती. 

            मला अजूनही अंगावरती शहरा येतो व आठवते की तिलारी उप विभागात हजर होण्याचा पहिला दिवस ज्या दिवशी हजर होण्यासाठी मी व माझे वडील एसटी महामंडळाच्या बसने कोणाळकट्टा येथे पोहोचलो. कोणाळकट्टा हे असं दुर्गम गाव आहे जिथे दिवसातून फक्त दोनदाच एसटीचा येते. कोणाळकट्टा गावामध्ये गेल्यानंतर उपविभागात हजर होण्यासाठी गेले असता समजले की तिलारी मोठ्या प्रकल्प या प्रकल्पाचा कालवा काही ठिकाणी फुटला होता व ज्यांच्याकडून कार्यभार स्वीकारायचा होता ते अधिकारी कॅनाॅलची पाहणी करण्याकरता कॅनॉल वरती उपस्थित होते. संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला असता त्यांनी मला कॅनॉलवरती येण्यासाठी सांगितले. पाहते तर काय कॅनॉल फुटलेला होता दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता गोव्याला पाणी द्यायचे होते. एका दिवसामध्ये कॅनॉलची दुरुस्ती करून लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता गोव्याला पाणी जाणे अपेक्षित होते. संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, आता तुम्ही हजर झालेला आहात या पुढील कार्यवाही तुम्ही पहावी मी आता निघतो, असे म्हणून ते निघून गेले. परंतु मी आवर्जून एक गोष्ट सांगू इच्छिते आपली जी पुरुषप्रधान संस्कृती आहे त्यानुसार संबंधित अधिकारी व तेथील कंत्राटदार किंवा कर्मचारी त्यांना असे बहुदा वाटत होते की ही महिला अधिकारी आहे ही काय काम करणार ही काय कॅनॉलमध्ये उतरणार किंवा ही काय रात्री थांबून काम करू शकणार असे  त्यांच्या मनात असावे असे त्यांच्या चेहऱ्यावरून निदर्शनास येत होते. परंतु त्या दिवशी मी थोडी मनातून घाबरले होते की दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी पोहोचवायचे आहे आणि एवढं मोठं काम करायचं आहे तर ते माझ्याकडून होईल की नाही अशी शंका होती. परंतु मनाच्या एका कोपऱ्यात असं वाटलं की, आपण ज्या पदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे त्यामुळे कोठेही काम करण्याची आपली जी जिद्द आहे ती या रूपाने साकार करण्यासाठी संधी आहे. त्यामुळे संधीचं सोनं करण्याच्या दृष्टीने मी तेथे कामास सुरुवात केली. जेव्हा आपण एखाद्या अडचणींना जिद्दीने आणि धीराने सामोरे जातो त्यावेळेस सगळेजण आपल्या सोबत काम करण्यास तयार होतात अशीच एक प्रचिती मला त्या दिवशी तिथे आली.

             सदरचे काम हे गर्द झाडी तसेच रात्री किरकिर किड्यांचा किर आवाज, अशा थंडगार भयानक रात्री सदरचे काम करत असताना संबंधित तेथील कर्मचारी व कंत्राटदार यांची मोलाची साथ लाभली. रात्रभर काम संपवून बरोबर सकाळी दुसऱ्या दिवशी  सात वाजता आम्ही त्या कॅनॉल मधून पाणी सोडून गोव्याला पाणी दिले. दुसऱ्या दिवशी जेव्हा गोव्याला पाणी जाताना गोव्याचे संबंधित कार्यकारी अभियंता यांनी पाहणी केली त्यावेळेस मात्र सर्वजणांनी माझ्यावरती कौतुकांचा वर्षाव केला. त्यावेळेस एक महिला इंजिनीयर अधिकारी असल्याचा खरंच अभिमान वाटला. तदनंतर मी अशाच प्रकारची बरीच कामे करत गेले. तसेच काही महिन्यानंतर सदरचा प्रकल्प हा प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना अंतर्गत घेण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यास माझ्या वरिष्ठांच्या सूचना मला प्राप्त झाल्या.  वरिष्ठांच्या सूचनेनुसार सदरचा प्रस्ताव तयार करून कोकणातील भर पावसातील रात्री व दिवस असा तिलारी विभाग सावंतवाडी ते मंडळ कार्यालय रत्नागिरी तसेच कोल्हापूर, मंत्रालय मुंबई, सी डब्ल्यू सी नागपूर, सीडब्ल्यूसी दिल्ली, तसेच मिनिस्ट्री ऑफिस दिल्ली येथे स्वतः जाऊन पाठपुरावा करून सदर प्रकल्पास 320 कोटीची मंजुरी प्राप्त करून दिली. हे काम करत असताना वेळोवेळी अधीक्षक अभियंता अजय दाभाडे साहेब यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. तसेच सदर प्रकल्पाचे देखभाल दुरुस्ती अंतर्गत धरणाची पाहणी करण्याकरता धरणावरती जाताना भर पावसामध्ये रात्रंदिवस जिथे धरणाकडे जाण्याचा रोड पूर्णपणे शेवाळलेला असतो व रोडच्या एका बाजूला डॅमचा सबमर्जन्स एरिया व दुसरा बाजूला डोंगरकडा अशातून जीप नेऊन धरणाची पाहणी करणं अत्यंत कठीण होतं. अशा ठिकाणी काम करणं म्हणजेच खरंच चॅलेंजिंग वर्क होतं जे मी अनुभवलेला आहे. एक महिला अधिकारी म्हणून मला माझा सार्थ अभिमान आहे अशा ठिकाणी मला दुर्गम व घनदाट जंगलात काम करण्याची संधी मिळाली त्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते.

              उपरोक्त सर्व अनुभव हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव असून बऱ्याच गोष्टी आयुष्यभर पुरेल असे येथे शिकण्यासाठी मिळालेले आहेत. उपरोक्त ठिकाणी काम करत असताना संबंधित माझे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, महसूल खात्याचे कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर, शेतकरी, रेल्वेचे कार्यकारी अभियंता अशा अनेक जणांच्या सहकार्यामुळे व अनमोल मार्गदर्शनामुळे मी हा रोमांचक प्रवास करू शकले त्यामुळे त्या सर्व जणांचे मनापासून आभार.

             कोशिश करने वालों की हार नही होती…. याप्रमाणे अंगावर शहारे आणणारा हा खडतर आणि प्रेयरणादायी प्रवास आहे तो म्हणजे श्रीमती स्नेहलता गावडे यांच्या जीवनातला. त्या लघु पाटबंधारे विभाग क्र. १ सोलापूर येथे कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत.

            इंजिनिअर गावडे मॅडम या मध्यमवर्ग कुटुंबातून आलेल्या. गावडे मॅडम यांचे वडील वरिष्ठ लिपिक म्हणून जलसंपदा विभागातच कार्यरत होते. त्यांच्या आई वडिलांची दृढ इच्छा होती की त्या जलसंपदा विभागामध्ये अधिकारी म्हणून नियुक्त व्हावे. त्यांचे प्राथमिक शिक्षण मोहोळ व मंगळवेढा या ठिकाणी तर माध्यमिक शिक्षण बार्शी येथे झाले. तदनंतर डब्ल्यूआय टी सोलापूर येथून सिव्हिल इंजिनिअरिंगचे ग्रॅज्युएशनचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. सन २००९ मध्ये प्रथम एम पी एस सी दिली त्यामध्ये आई-वडिलांच्या आशीर्वाद व त्यांच्या मुलीची साथ यामुळे त्या राजपत्रित अधिकारी म्हणून असिस्टंट इंजिनिअर ग्रेड-१, या पदावर त्यांची नियुक्ती झाली. या पदावर त्या उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात लघु पाटबंधारे स्थानिक स्तर उपविभाग कळब व अतिरिक्त कार्यभार उमरगा उपविभाग या ठिकाणी कार्यरत होत्या. उमरगा या ठिकाणी १४ सिमेंट नाला बांध बांधून माननीय मंत्री चव्हाण साहेब यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पाडला. तदनंतर सोलापूर येथे सहाय्यक अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, सोलापूर या ठिकाणी त्या रुजू झाल्या. सोलापूर येथेच कार्यरत असताना परत २०१३ साली त्यांनी एमपीएससीची परीक्षा दिली. त्यामध्ये राजपत्रित अधिकारी म्हणून सहाय्यक कार्यकारी अभियंता या पदावर त्यांची निवड झाली. सदर पदावर नियुक्ती मिळाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुका अंतर्गत कोणाळकट्टा येथे तिलारी मोठा प्रकल्प यावरती तिलारी कालवा उपविभाग क्रमांक २, कोणाळकट्टा या ठिकाणी रुजू झाल्या सदरचा भाग हा दुर्गम व अति घनदाट जंगलातील असल्याकारणाने सोलापूर जिल्हा ते अति घनदाट जंगल हा प्रवास खरच खूप रोमांचक होता. त्या ठिकाणी काम करताना ४००० ते ४५०० मिलिमीटर पाऊस, घनदाट जंगल, शेवाळलेले रोड, वन्यप्राणी यामध्ये काम करत असताना बऱ्याच अडचणींना सामोरे जात प्रकल्पाची कामे मार्गी लावली. तिलारी प्रकल्प हा निसर्गरम्य व नयनरम्य अशा घनदाट जंगलातील तो मोठा प्रकल्प आहे. तसेच तो आंतरराज्य प्रकल्प आहे. गोवा व महाराष्ट्र या दोन राज्यांसाठी हा प्रकल्प असून या प्रकल्पाची निर्मिती गोव्याला पाणी देण्यासाठी व महाराष्ट्रातील सिंचनासाठी आहे. तिलारी हा प्रकल्प प्रथमतः प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेअंतर्गत घेऊन तो सी डब्ल्यू सी नागपूर तसेच सीडब्ल्यूसी दिल्ली येथून मंजुरी घेऊन सदर प्रकल्पाचे कामे त्यांनी मार्गी लावले. त्यानंतर त्या बदलीने गुणनियंत्रण उपविभाग सोलापूर या ठिकाणी रुजू झाल्या. तदनंतर पदोन्नतीने कार्यकारी अभियंता म्हणून लघु पाटबंधारे विभाग क्रमांक १, सोलापूर येथे २०२१ साली रुजू होऊन येथील जुन्या प्रकल्पांचे गेले २०-२५ वर्षापासून रखडलेले भूसंपादन व न्यायालयीन प्रकरणे तसेच बऱ्याच जुन्या प्रकल्पाचे सुधारित प्रशासकीय मान्यता घेण्याचे कार्य अद्याप पर्यंत करत आहेत.

            सदरचा प्रवास हा फारच खडतर असून तो इतरांना नक्कीच प्रेरणादायी ठरणारा आहे.

….. धनंजय तानले

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्री. डी.सी. डुकरे सर यांना २०२४ चा राज्यस्तरीय लोकराजा शाहू आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

परभणी : मागील तीस वर्षांपासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करणारे अभ्यासू अध्यापक तथा राष्ट्रमाता इंदिरा...

धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे देण्याची मागणी

नाशिक : धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी व विशेषतः धनगर समाजाला मंत्रीमंडळात प्रतिनिधित्व मिळावे या...

मा. मंत्री आण्णासाहेब डांगे यांचे सुपुत्र सर्जेराव डांगे यांचे दुःखद निधन

इस्लामपूर : येथील सर्जेराव रामचंद्र डांगे (दादा) यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले...

महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा उत्साहात साजरा…

पुणे: महाराजा यशवंतराव होळकर यांचा २४९ वा जयंती सोहळा वाफगाव या त्यांच्या जन्मगावी अहिल्यारत्न...