आमच्याबद्दल
माहिती तंत्रज्ञान व स्पर्धेच्या युगामध्ये आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे कि, भारताला जगातील अव्वल राष्ट्र बनविण्यासाठी, देशाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित असलेल्या धनगर जमातीला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि जमातीमधील शेवटच्या घटकापर्यंत पोहचून आधुनिक जगाची ओळख करून देण्यासाठी "धनगर जमातीला" केंद्रस्थानी ठेवून या समाजाशी निगडित असलेल्या व्यक्ती, संस्था, संघटना यांच्या कार्याचा प्रचार व प्रसार करणारी देशातील पहिली वृत्तवाहिनी तथा चळवळ म्हणजे धनगर माझा होय.
आम्ही केवळ बातम्या, छापून किंवा प्रकाशित करत नाहीत तर त्यासोबत गेल्या ९ वर्षापासून पुणे, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पिंपरी चिंचवड, नाशिक अशा विविध ठिकाणी अनेक सामाजिक कार्यक्रम उपक्रम सातत्याने राबवित आहोत.
धनगर समाजातील अधिकारी - कर्मचारी, उद्योजक, व्यावसायिक, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आदि क्षेत्रातील संघटन, एकोपा मजबूत करण्यासाठी याचा उपयोग झाला आहे. तसेच समाजाच्या विविध प्रश्नांना वाचा काम सातत्याने धनगर माझा टीमने केले आहे. तर राष्ट्रीय महापुरुषांचे विविध ठिकाणी जयंती महोत्सव घेवून आपल्या अलौकिक सोनेरी इतिहासावर प्रकाश टाकण्याच काम धनगर माझा करत आहे.
म्हणजेच , धनगर माझा हि व्यावसायिक पत्रकारिता नसून सामाजिक पत्रकारिता तथा चळवळ आहे. म्हणून ती धनगर समाजाच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरली असून ती टिकणे ही धनगर माझा काळाची बनली आहे.
आपला
धनंजय मारुती तानले
संपादक तथा मुख्य प्रवर्तक - धनगर माझा